कार चालकाकडून एसटी बस चालकास मारहाण

333

वाकड, दि. २१ (पीसीबी)- बेंगलोर-मुंबई महामार्गाने जात असलेल्या एसटी बसच्या चालकाला एका कार चालकाने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 21) मध्यरात्री साडेबारा वाजता वाकड ब्रिज जवळ घडली.

एसटी बस चालक सचिन हणमंत ढमाळ (वय 43, रा. आसवली, ता. खंडाला, जि. सातारा) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार (एमएच 05/एजे 5794) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे परेल एसटी डेपोची पंढरपूर-मुंबई ही एसटी बस फलटण येथून ताब्यात घेऊन मुंबईच्या दिशेने जात होते. बेंगलोर-मुंबई महामार्गाने जात असताना वाकड ब्रिजजवळ त्यांची बस आरोपी कार चालकाने अडवली. ‘माझ्या गाडीला तुझी बस ठोकली असती’ असे म्हणत आरोपीने बस चालकाला शिवीगाळ करून मारहाण केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.