कार अंगावरून गेल्‍याने लहान मुलगा जखमी

0
28

पिंपरी, दि.४ (पीसीबी)

कार मागे घेत असताना पावणे दोन वर्षीय मुलाच्‍या अंगावरून गेल्‍याने तो गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजताच्‍या सुमारास जांबे येथे घडली.

संदीप गायकवाड (रा. जांबे, ता. मुळशी, जि. पुणे) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपीचे नाव आहे. दीपक उत्‍तम रणदिवे (वय २५, रा. सावता माळी मंदीर रोड, जांबे) यांनी सोमवारी (दि. २) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा रूद्र हा मामाचा मुलगा दत्‍ता सोबत घरासमोर खेळत होता. त्‍यावेळी घरमालक संदीप गायकवाड हा त्‍याची कार घेऊन आला. कार मागे घेत असताना रूद्र याच्‍या अंगावरून कार गेल्‍याने तो गंभीर जखमी झाला. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.