कारमधून दहा तोळे दागिने लंपास

0
102

देहूगाव येथे सरस्वती लॉन्स समोर पार्क केलेल्या कारमधून चोरट्याने दहा तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि. 15) दुपारी दीड ते अडीच वाजताच्या सुमारास घडली.

गणेश दत्तात्रय डावरे (वय ३४, रा. रासे फाटा, ता. हवेली) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डावरे यांनी त्यांची कार (एमएच 14/ईच 2450) देहूगाव येथील सरस्वती लॉन्स समोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने डावरे यांच्या कारची काच खाली करून कारमधून 10 तोळे वजनाचे पाच लाख रुपयांचे दागिने चोरून नेले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.