कारच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

0
40

रस्ता ओलांडत असताना ओमिनी कार च्या धडकेत एका 80 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे हा अपघात 19 मार्च 2024 रोजी सकाळी पुणे नाशिक महामार्गावर घडला.

याप्रकरणी मंगळवारी (दि.14) कालिदास सुभाष लोहार उर्फ पोपळघट (वय 50 रा. वारजे,पुणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी ओमिनी कारचालक अबरार फकीर महंमद शेख (वय 42 राजगुरुनगर खेड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात सुभाष अंबरऋषी लोहार उर्फ पोपळघट (वय 80 ) यांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष लोहार हे पायी रस्ता ओलांडत होते. यावेळी आरोपीने त्याच्या ताब्यातील मारुती ओमिनी ही कार भारधाव वेगाने चालवून वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत लोहार यांना धडक दिली. या अपघातात लोहार हे गंभीर जखमी झाले व त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.