कारच्या डॅशबोर्ड मधून रोख रक्कम चोरीला

0
271

कारच्या डॅशबोर्ड मध्ये ठेवलेली 50 हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 30) दुपारी तीन ते सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मोहननगर चिंचवड येथे घडली.

अंकित अर्जुन प्रसाद (वय 32, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची कार मोहननगर चिंचवड येथील स्पिंग टेनॉर्जिंग या कंपनीच्या आवारात पार्क केली होती. मंगळवारी दुपारी तीन ते सहा वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या कारच्या डॅशबोर्ड मध्ये ठेवलेली 50 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.