कामावरून काढून टाकल्याच्या रागातून चार वाहने पेटवली

0
284

कामावरून काढून टाकल्याच्या रागातून एकाने चार वाहनांवर डीझेल ओतून पेटवून दिली. ही घटना गुरुवारी (दि. 18) मध्यरात्री साडेबारा वाजता गणेशनगर तळवडे येथे घडली.

केशव निवृत्त गाढवे (वय 38, रा. मोरेवस्ती, चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी प्रशांत रूपनवर (वय 42, रा. पिंपळे सौदागर) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत यांनी आरोपी केशव याला कामावरून काढून टाकले होते.त याचा राग केशव याच्या मनात होता. त्यावरून तो गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता प्रशांत यांच्या दुकानात आला. त्याने दुकानासमोरील चार वाहनांवर डीझेल ओतले आणि वाहने पेटवून त्यांचे सुमारे चार लाखांचे नुकसान केले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.