कामाच्या शोधात आलेल्या महिलेवर बलात्कार..

0
444

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – एका महिलेच्या ओळखीने काम शोधण्यासाठी आलेल्या महिलेवर 50 वर्षीय व्यक्तीने बलात्कार केला. तसेच याबाबत कोणास काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि. 8) दुपारी दोन वाजता चिंचवडेनगर येथे घडली. श्रावण भीमराव मेहकरे (वय 50, रा. भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय पीडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या घरासमोर एक महिला काम करते. फिर्यादीकडे काम नसल्याने त्यांनी त्या महिलेस कामाबद्दल विचारले. त्यावर महिलेने आरोपी श्रावण मेहकरे याचा संदर्भ देत त्याच्याकडे काम असल्याचे सांगितले. फिर्यादी कामाला जाण्यास तयार झाल्यानंतर बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता आरोपीने त्याच्या दुचाकीवर बसवून पीडित महिलेला चिंचवडेनगर येथील खोलीवर नेले. तिथे महिलेवर बलात्कार केला. घडलेल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगितले तर माझा मेहुणा डाकू आहे. लोकांना मारून पैसे घेतो. तो तुला पण मारून टाकीन’ अशी आरोपीने धमकी दिली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.