कामगारांसाठी एमआयडीसी मार्गावरील PMPL बसेच्या फेऱ्यावाढवा – सरोज कदम, महिला शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी

0
116

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहारातून मोठ्या संख्येने चाकण औद्योगिक क्षेत्रातील मोठ्या, मध्यम,लघु कंपन्यांमध्ये कामगार कामावर जात असतात. शहरातील मोठ्या रूटवरील उपनगरात कामगार रहात आहेत. यातील कंत्राटी, स्थलांतरित तसेच महिला कामगारांना कंपन्यांची बससेवा नाही, कारण ते असंघटित आहेत. चाकण परिसरात बहुसंख्य या रूट वरून जाणारा कामगार वर्ग जास्त आहे. महिंद्रा सारख्या नामवंत कंपन्या व व्हेंडर्स कंपन्या मध्ये काम करणाऱ्या कामगारांना खात्रीशीर बससेवा नसल्याने कामगार दुचाकी, कार, रिक्षा याचा वापर जास्त करतात तसेच अवजड वाहनांमुळे हा संपूर्ण रूट विशेषतः यमुनानगर ते तळवडे आय टी पार्क आणि त्यानंतर चाकण हद्दीतून जाणाऱ्या या प्रशस्त रोडवर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते असते त्यामुळे कामावरून येताना व जाताना कामगारांना प्रचंड मनस्ताप होतो तसेच लोक कंपनीत सुदधा वेळेत पोचण्यासाठी अडचण होते. ट्राफिक जॅम मुळे हे कामगार वेळेत घरी येऊ शकत नाहीत. त्यामुळे कामगारांना अधिक शारीरिक थकवा येऊन त्यांचे आजारी चे प्रमाण सुद्धा वाढले आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही सामान्य लोकांना त्यांच्या कामाच्या वेळेत येण्याजाण्यासाठी असावी, तीही सवलतीच्या दरात असावी, हा आम आदमी पार्टीचा अजेंडा आहे. PMPL प्रशासनाने औद्योगिक कामगारांच्या हिताच्या दृष्टीने बसमार्ग व्यवस्थापन केले नाही, त्यामुळे खाजगी दुचाकी व इतर चारचाकी वाहनांचा नाईलाजाने कामगारांना आधार घ्यावा लागत आहे, त्यामुळे तळवडे चाकण येथे वाहतूक कोंडी आहे. शहरातील वाहतूक कोंडीची कारणे सार्वजनिक वाहतूक सेवेच्या दुर्लक्षामुळे आहे, असे आम आदमी पार्टीच्या महिला आघाडी अध्यक्षा सरोज कदम यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

त्यांनी मागणी केली आहे की, आकुर्डी रेल्वे स्टेशन ते चाकण म्हाळुंगे एम आय डी सी मध्ये जाण्यासाठी सकाळी 5 ते सकाळी 10 व दुपारी 2 ते 5 आणि रात्री 8 ते रात्री 12.30 यावेळात पीएमपीएल बसच्या फेऱ्या दर 15 मिनिटाला एक अशी वाढवावी. त्यामुळे वेळेत व खात्रीशीर बससेवा मिळेल असा विश्वास कामगारांमध्ये निर्माण होईल,त्यांच्या कामाच्या शिफ्ट प्रमाणे नियोजन करून सवलतीच्या दरात चाकण रूटवर दार 15 मिनिटाला फेऱ्या वाढवाव्यात अशी मागणी सरोज कदम ह्यांनी केली आहे.याबाबत PMPL प्रशासनाने तातडीने सर्वेक्षण करून औद्योगिक कामगारांसाठी बससेवा सक्षम करावी, असे सरोज कदम यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.