कानाखाली मारल्याने तरुणाचा खून

435

वाकड, दि. २९ (पीसीबी) – कानाखाली मारल्याच्या रागातून दहा जणांनी मिळून एका तरुणाचा चाकूने भोकसून खून केला. तसेच मयत तरुणाच्या मित्रावर खूनी हल्ला केला. ही घटना गुरुवारी (दि. 28) सायंकाळी वाकड गावठाण येथे घडली.

दिपक भगवान गायकवाड उर्फ खंडू असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर लखन लगस याच्यावर खूनी हल्ला केला आहे. याप्रकरणी आदित्य अशोक थोरात (वय 19, रा. वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुमित सावंत, अमोल देशमुख, अभिषेक उर्फ नंदू कांबळे, सुजीत लोंढे, आशिष भिसे उर्फ मर्फी, ब्रम्हा जाधव, महेश जाधव, उत्कर्ष जाधव, सौरव जाधव (सर्व रा. वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुजीत लोंढे याला खंडू आणि लखन यांनी कानाखाली मारली होती. त्याचा राग आरोपीच्या मनात होता. त्या कारणावरुन आरोपींनी “थाबा तुमची विकेटच टाकतो”, असे म्हणून खंडूच्या पोटात चाकूने भोकसून त्याचा खून केला. लखन लगास याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीसह इतरांना चाकू, लोखंडी रॉड, पाने, रस्त्यावरील दगडांनी मारहाण करुन जखमी केले. आरोपींनी परीसरात दहशत निर्माण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत