काँग्रेस संघटनेचे तळागाळापर्यंत काम – नाना पटोले

0
33

 दि. ५ ऑगस्ट (पीसीबी) पिंपरी,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नाना पटोले हे कामगार संघटनेच्या आक्रोश मेळाव्यास आले असता त्यांनी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या खराळवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयास भेट दिली. शहर काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेऊन शहर काँग्रेसच्या विविध उपक्रमाची व कार्यक्रमाची सविस्तर माहिती घेतली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग रचना, तिन्ही विधानसभा निहाय बूथ कमिटी बनविणे बाबतची माहिती व शहरातील प्रमुख नागरी समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीचा संघटनात्मक कामाचा आढावा घेतला, तसेच शहर काँग्रेस कमिटीतर्फे राबवल्या जाणाऱ्या ‘काँग्रेस पक्ष करदात्या नागरिकांच्या दारी’ डिजिटल प्रचार वाहनांचा शुभारंभ करण्यात आला. शहर काँग्रेसने गेले तीन वर्ष राबविलेली उपक्रम, कार्यक्रम, आंदोलने तसेच संघटनेचे काम बघता, प्रांताध्यक्ष पटोले यांनी तळागाळापर्यंत काँग्रेस पक्ष काम करीत असल्याचे समाधान व्यक्त केले तसेच होऊ घातलेल्या विधानसभा व महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्व कार्यकर्त्यांनी कामास लागावे अशी सूचना केली.

या प्रंसगी शहराध्यक्ष डॉ, कैलास कदम, राष्ट्रीय सेवादल सचिव संग्राम तावडे, माजी महिला काँगेस प्रदेशाध्यक्षा श्रीमती श्यामला सोनवणे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब मुगुटमल, राजाराम भोंडवे, संदेश नवले, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पर्यावरण विभाग सरचिटणीस अमर नाणेकर, माजी एनएसयूआय प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे, प्रदेश कॉंग्रेस सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्ष वाहब शेख, वरिष्ठ उपाध्यक्ष मयूर जयस्वाल, अॅड. अनिरुध्द कांबळे, भरत वाल्हेकर, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, प्रदेश युवक काँग्रेस सचिव व राष्ट्रीय प्रवक्ते गौरव चौधरी, सेवादल अध्यक्ष प्रा. किरण खाजेकर, प्रोफेशनल कॉंग्रेस अध्यक्ष दाहर मुजावर, झोपडपट्टी सेल अध्यक्ष प्रा, बी, बी. कांबळे, डॉक्टर सेल अध्यक्षा मनिषा गरुड, महाराष्ट्र व्यापारी सेलचे अमरजीतसिंग पाथीवाल, शहर उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, मेहबूब शेख, अर्चना राऊत, स्मिता पवार-मुलाणी, महेश पाटील, गणेश गरड शहर सरचिटणीस मून्साफअली खान, निखिल भोईर, सतीश भोसले, वसंत वावरे, रवींद्र कांबळे, सचिन गायकवाड, शहर सचिव अॅड. मोहन अडसूळ, गौतम ओव्हाळ, अॅड. अनिकेत रसाळ, आकाश शिंदे, योगेश बहिरट, युनूस बागवान, पिंपरी ब्लॉक उपाध्यक्षा ज्योती गायकवाड, अरुणा वानखेडे, निर्मला खैरे, शहाबुद्दीन शेख, मकरध्वज यादव, विशाल कसबे, फिरोज तांबोळी, कुंदन कसबे, तुषार पाटील, आवेज सय्यद, राजन नायर, सुनील राऊत, बाबा वाघमारे, विकास कांबळे, इरफान शेख, आदींसह या बैठकीस शहर काँग्रेस मधील आजी-माजी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.