काँग्रेसचं टेंशन वाढलं…! राजस्थानमध्ये कोणाचं सरकार ?

0
158

देश,दि.०१(पीसीबी) – राजस्थानमध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार हे 3 डिसेंबरच्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल, पण एक्झिट पोलच्या आकडेवारीवरीने मात्र काँग्रेसचं टेंशन वाढलं आहे. एक्झिट पोलने काँग्रेसची झोप उडवली आहे.

राजस्थानमध्ये 25 नोव्हेंबर रोजी 199 जागांसाठी मतदान झालं होतं. अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने तीन दशकांची जुनी परंपरा मोडीत काढत सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापनेसाठी सगळे प्रयत्न केलेत. मात्र काही एक्झिट पोलने राजस्थानमध्ये कमळ येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

राजस्थानमध्ये कमळ येणार?
इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्येही भाजपला राजस्थानमध्ये आघाडी मिळाल्याचं दिसून आलं आहे. भाजपला 110 ते 110 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 90 ते 100 जागा मिळतील, असं सांगितलं जात आहे. न्यूज 18 च्या एक्झिट पोलने राजस्थानमध्ये भाजपला 111 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. काँग्रेसला 74 तर इतरांना 14 जागा मिळतील.

काँग्रेस आणि भाजपमध्येच लढत
राजस्थानमध्ये प्रामुख्याने काँग्रेस आणि भाजपमध्येच लढत आहे. मात्र, बहुजन समाज पक्ष, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष, आझाद समाज पक्ष (कांशीराम), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय-एम), भारत आदिवासी पक्ष, जननायक जनता पक्ष, भारतीय आदिवासी पक्ष या पक्षांनीही लढत देण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, राजस्थानमध्ये जवळपास 75 टक्के मतदान झाले. पोखरण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 87.79 टक्के मतदान झालं. तिजारा 85.15 टक्के मतदानासह दुसऱ्या स्थानावर आहेत. मारवाड जंक्शन विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 61.10 टक्के मतदान झाले.