कष्टकरी महिलांवरील अन्याय थांबवा – रुपलीताई चाकणकर यांचेकडे मागणी .

0
237

पिंपरी दि.२६ (पीसीबी) – महाराष्ट्र राज्यातील कष्टकरी महिला कामगारांचे जिवन असुरक्षित असून घरेलु कामगार, बांधाकाम कामागर, कंत्राटी सफाई महिला कामगार यांना पर्यवेक्षक,मालक ,प्रशासकिय यंत्रणेतून छळ,मारहाण, देय वेतन नाकारणे असे अन्याय थांबवावेत अशी मागणी कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांचेकडे करण्यात आली.

यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, राष्ट्रवादी काँग्रेस महिला वरिष्ठ कार्याध्यक्षा कविता खराडे, महासंच्या महिलाध्यक्षा माधुरी जलमूलवार, अनिता जाधव,बालाजी लोखंडे,उमेश डोर्ले,पांडुरंग शेळवणे,आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाना दिलेल्या पत्रात चिखली येथे फळ विक्री करणाऱ्या मनीषा शेळवणे यांचेवर मनपा प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी चुकीच्या पद्धतीने कारासाई करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली याची चौकशी करून दोषींवर कारवाई

कारवाई करावी अशी मागणी करत चिखली घाटनेप्रमाणे विविध ठिकाणी कष्टकरी महिला कामगार काम करत असताना किमान व समान वेतन न देणे,कामगार अपघात प्रसंगी भरपाई न देणे, छेडछाड असे अनेक प्रकार घडत असून कष्टकरी महिलांवरील अन्याय दूर करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी मागणीस द्वारे चर्चा केली. यावर सकारात्मक विचार करू असे म्हणत आश्वासन राज्य महिला आयोग अध्यक्षांनी यावेळी दिले.