कर्ज मंजूर करून देतो म्हणून महिलेची फसणूक

107

पुणे, दि.९ (पीसीबी) – कर्ज मंजूर करुन देतो म्हणून महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही फसवणूक 29 जानोवारी ते 30 जानेवारी 2024 या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडली आहे.

महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तळेगाव दाभाडे पोलिसांनी आदर्श वर्मा (पुर्ण नाव माहिती नाही) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना बजाज फायनान्ससचे अडीच लाखांचे कर्ज मिळवून देतो असे आमिष आरोपीने दाखवले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फिर्यादी यांच्याकडून 5 हजार 181 रुपये घेत फसवणूक केली आहे. यावरून तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.