कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा

0
34

कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. ही कारवाई शनिवारी (दि. 11) दुपारी एक वाजताच्या सुमारास रोहकल फाटा, डायमंड चौक, चाकण येथे करण्यात आली.

सुखदेव लक्ष्मण टोपे, तुकाराम विठोबा टोपे (वय 54, दोघे रा. वाकी बुद्रुक, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुषमा मोहिते यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी चाकण येथे जनावरांचा बाजार भरतो. तिथून आरोपींनी एका टेम्पोतून दोन बैलांची कत्तलीसाठी वाहतूक केली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर चाकण पोलिसांनी कारवाई करत दोघांवर गुन्हा नोंदवला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.