कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

0
267

भोसरी, दि. २३ (पीसीबी)-कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या तिघांवर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. २१) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास मोशी जाणारांचा बाजार येथे करण्यात आली.

बाळाप्पा छत्राराप्पा कुरबुड (वय ३३, रा. खडकी), सौरव राजू गडाप्पा (वय २२, रा. खडकी), महम्मद शरीफनजीर अहमद कुरेशी (वय ३५, रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शिवशंकर स्वामी (वय २७, रा. सिंहगड रोड, पुणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मोशी येथील जनावरांच्या बाजारातून कत्तलीसाठी दोन बैल आणि एक कालवड अशी जनावरे खरेदी केली. ती जनावरे घेऊन जात असताना पोलिसांनी कारवाई करून टेम्पो आणि तीन जनावरे असा दोन लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.