कंपनीतून दीड लाखांचे इलेक्ट्रिक साहित्य चोरीला

0
72

कंपनीतून दीड लाखांचे इलेक्ट्रिक साहित्य चोरीला गेले आहे, ही चोरी खेड येथील करंजविहिरे गावातील एसेंडास फस्टस्पेस या कंपनीत 22 ते 23 मे 2024 या कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी गुरुवारी (दि.30) मोहम्मद अन्वर अन्सारी (वय 31 रा.मिंडेवाडी मावळ) यांनी महाळुंगे पोलीस ोठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या कॅम्पमध्ये सुरु असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सामान ठेवले होते. चोराने त्यातील 1 लाख 59 हजार रुपयांचे इलेक्ट्रीक साहित्य चोरून नेले आहे, यावरून महाळुंगे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध घेत आहेत.