कंपनीतील सहकारी तरुणाला रॉडने मारहाण

0
143

भोसरी, दि. १४ (पीसीबी) -कंपनीतील महिलेने सुनावल्याच्या रागातून एकाने सहकारी तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. १३) रात्री आठ वाजताच्या सुमारास मारुंजी येथील मदरसन कंपनीत घडली.

प्रवीण संदीपान माने (वय २४, रा. काळेवाडी) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मदन बाळू गायकवाड (वय २७, रा. सम्राट चौक, वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काम करत असलेल्या मदरसन कंपनीतील सहकारी मदन याने फिर्यादीस बाजूला बोलावून नेले. एका महिलेने मदन याला चारचौघात सुनावले असून तिला तू माझ्याबद्दल काय सांगितले, असे म्हणत मदन याने फिर्यादी यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.