कंपनीचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला; ‘एवढ्या’ लाखांचा माल चोरी केला

0
26

महाळुंगे, दि. 29 (पीसीबी) : कंपनीच्‍या मागील बाजूस असलेला पत्रा उचकटून चोरट्यांनी एक लाख ६६ हजार ५०० रुपयांचे साहित्‍य चोरून नेले. ही घटना खालुंब्रे येथील इलेक्‍ट्रा कंपनीत घडली.

संजय वामन कटके (वय ४९, रा. भिगवण रोड, ता. बारामती, जि. पुणे) यांनी बुधवारी (दि. २७) याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, १९ नोव्‍हेंबर रोजी रात्री साडेआठ ते २१ नोव्‍हेंबर रोजी सकाळी आठ वाजताच्‍या दरम्‍यान फिर्यादी यांची इलेक्‍ट्रा ही कंपनी बंद होती. या कालावधीत चोरट्याने कंपनीच्‍या मागील बाजूचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला. आतील एक लाख ६६ हजार ५०० रुपये किमतीच्‍या एक हजार ८५० किलो वजनाच्‍या नटबोल्‍टच्‍या ४३ गोणी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्‍या. महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.