सिकंदर शेख याने गतविजेता शिवराज राक्षेला वीस सेकंदात केले चीत

0
282

पुणे, दि. ११ (पीसीबी) : महाराष्ट्र केसरी 2023-24 च्या फायनलमध्ये वाशिमच्या सिकंदर शेख याने गतविजेता शिवराज राक्षेला वीस सेकंदाच्या चीत करत मैदान मारलं. बलदंड शरीर यष्टीच्या शिवराजला अवघ्या दहा सेकंदामध्ये त्याने अस्मान दाखवत 66 वा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला. मागील वर्षी हुकलेली संधी सिकंदरच्या डोक्यात होती. अवघ्या महाराष्ट्राने महेंद्र गायकवाड याच्याकडून झालेला पराभव पाहिला होता. पण गडी खचला नाही आपला सराव सुरू ठेवला आणि यंदा मागील वर्षीचा विजेता शिवराज राक्षे याला पराभूत विजयश्री मिळवला.

माती विभागामध्ये झालेल्या सेमी फायलनमध्येही सिकंदर याने संदीप मोटे याचा 10-0 ने पराभव करत एकतर्फी विजय मिळवत फायनल गाठली होती. तर गादी विभागामध्ये शिवराज राक्षे याने हर्षद उर्फ माऊी कोकाटे याला 13-2 ने पराभूत करत फायनल गाठली होती. दोघेही मोठे मल्ल, बलदंड शरीरयष्टीचा शिवराज आणि चपळ चिता असलेला सिकंदर यांच्यात डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या कुस्तीची अपेक्षा सर्वांना होती. मात्र सिकंदरने सुरूवातीला झोळी डाव टाकत अवघ्या काही सेकंदातच मैदान मारलं.
सिकंदर शेख मागच्या वेळेसच महाराष्ट्र केसरी झाला असता. पण आता सिकंदरचं महाराष्ट्र केसरी होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. सिकंदर आता सुवर्णपदक मिळवण्यासाठी पुढची वाटचाल करणार आहे. आम्ही सगळे भाऊ त्याची तयारी करून घेतोय, अशी प्रतिक्रिया सिकंदर शेख याचे काका शापी शेख यांनी दिली.