औरंगाबादला आता संभाजीनगर म्हणा…

51

मुंबई, दि. २९ (पीसीबी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या कॅबीनेट बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष पाहता उद्धव ठाकरे सरकारची ही कदाचित शेवटची बैठक होती.

अद्याप बहुमताची चाचणी पेंडिंग आहे. मात्र, त्याआधीच ठाकरे सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. नामांतराचे दोन प्रस्ताव मंजूर झाले असून यामध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी मंजूर झाली आहे. तसेच उस्मानाबादचं धाराशिव नामकरण होणार असल्याचं स्पष्ट झालंय.