उद्योजक कांतिलाल खिंवसरा यांचे निधन, सायंकाळी अंत्यसंस्कार

0
131

पुणे, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील प्रसिध्द उद्योजक, दानशुर व्यक्तीमत्व, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कांतीलालजी मोहनलालजी खिंवसरा (वय – ९१) यांचे आज सकाळी दहा वाजता ह्दयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी निर्मला, कन्या मंगला गावडे, शास्वती भंडारी आणि चिरंजीव बिल्डर सिध्दार्थ खिवंसरा असा मोठा परिवार आहे.

मोहन नगर, चिंचवड़ येथे कायम निवास असलेले कांतिलालजी यांनी शहरात अनेक संस्था संघटन उभ्या केल्या आणि अखेरपर्यंत त्यांचे आधारस्तंभ म्हणून कार्य केले. मोहननगर येथे अंधांसाठी स्वतंत्र संस्था चालवली. शिरगाव येथे वृध्दाश्रम त्यांनी सुरू केला. निगडी कृष्ण मंदिरासाठी जागा अर्पण केली. मोहननगर बुध्दविहारासाठी जागा दिली. क्रांतिवीर चापेकर शाळेसाठीही मोठी जमीन दिली. ज्ञानप्रबोधिनी मातृमंदिर विश्वस्थ संस्था, क्रांतिवीर चापेकर संस्थेचे माजी अध्यक्ष म्हणूनही काम केले.

आज सायंकाळी पुण्यातील वैकंठ स्मशानात सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कऱण्यात येणार असल्याचेो नातेवाईकांनी कळविले.