‘उत्सव श्री गणेशाचा फोटो काँटेस्ट 2022’ स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

251

पिंपरी दि. २९ (पीसीबी) – शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे आणि पुणे पल्सच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘उत्सव श्री गणेशाचा फोटो काँटेस्ट 2022’ स्पर्धेतील विजेत्यांना नुकतेच पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

 हॉटेल टिप टॉप इंटरनॅशनल वाकड येथे स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. राहुल कलाटे, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवतळे, इन्फोलन्स मिसेस इंडिया 2020 विजेत्या निरुपमा मोहंती, मृण्मयी गाडगीळ मंगेशकर, गायत्री बिरारी, चार्मी ठक्कर, दत्तात्रय देशमुख व सुधीर देशमुख, स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धक, नागरिक मोट्या संख्येने उपस्थित होते.

गौरी सजावट स्पर्धेत किशोर पाटील (प्राइम प्लस, पिंपळे सौदागर) यांना प्रथम पारितोषिक, कोमल पाटील (कॅलिस्टो सोसायटी, वाकड) यांना द्वितीय पारितोषिक मिळाले. तर, कविता राजेश वालगुडे (लॅटिट्युड सीएचएस, वाकड), निशा काटे (विनायक नगर पिंपळे निलख), सविता दीपक परिहार (लॅटिट्युड सोसायटी, वाकड, शुभांगी दत्ता वडघरे (दत्त मंदिर रोड), निलेश मारवाडे (अंशुल कासा सोसायटी, वाकड) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

घरचा गणपती सजावट स्पर्धेत विशाल दत्ता (लिओन ऑर्बिट, पिंपळे सौदागर) यांना प्रथम, रवी चौहान (साई व्हिजन, पिंपळे सौदागर) यांना द्वितीय पारितोषिक देवून गौरविण्यात आले. तर, योगेश लक्ष्मणराव पाटील (ओएसिस सोसायटी, पिंपळे निलख), पंडित सुतार (सोनिगरा लॉरेल वाकड), विजया गुजराती (मी कासा बेला, वाकड), स्नेहल कुलकर्णी (कुंदन इस्टेट, पिंपळे सौदागर), गोपीनाथ कुलकर्णी (पलाश सोसायटी, वाकड), अभय गायकवाड (प्लुमेरिया ड्राईव्ह सोसायटी, पुनावळे) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

सोसायटी गणपती सजावट स्पर्धेत मॅक्सिमा सोसायटी, वाकड यांना प्रथम, कुणाल आयकॉन, पिंपळे सौदागर यांना द्वितीय पारितोषिक मिळाले. एडन टॉवर्स, वाकड, कॅप्रिसिओ सोसायटी, वाकड, पलाश सोसायटी वाकड, अपोस्ट्रॉफी सोसायटी, वाकड, कॅपिटल टॉवर्स, वाकड यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.