उघड्या दरवाजा वाटे तीन मोबाईल आणि तीन लॅपटॉप चोरीला

0
163

खोलीच्या उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश करून चोरट्याने तीन मोबाईल फोन आणि तीन लॅपटॉप चोरून नेले. ही घटना 16 ते 23 मे या कालावधीत साखरे वस्ती रोड, नारायण नगर, हिंजवडी येथे घडली.

याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या खोलीचा दरवाजा उघडा असताना अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला. घरातून 30 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन, 55 हजार रुपये किमतीचे तीन लॅपटॉप आणि 100 रुपये किमतीचे एक पाकीट असा एकूण 85 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.