उघड्या दरवाजा वाटे एका तासात घरातील दागिने व रोख रक्कम चोरीला

83

चाकण, दि. २८ (पीसीबी) : उघड्या दरवाजे वाटे अवघ्या एक तासात सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला ही घटना शनिवारी (दि.24) चाकण येथील राणूबाईमळा परिसरात दुपारी पाच ते सहा या कालावधीत घडली आहे.

या प्रकरणी महिलेने रविवारी (दि.25) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांच्याकडून घराचा दरवाजा अर्धवट उघडा राहिला होता. यावेळी चोराने दरवाजा वाटे घरात प्रवेश करत घरातील बागे मधून सोन्याचे दागिने व रोख ,रक्कम मोबाईल असा एकूण 67 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध घेत आहेत.