उघड्या दरवाजावाटे 50 हजारांचे साहित्य चोरीला

0
38

दि ४ जुलै (पीसीबी ) – उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश करून घरातील 50 हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 2) सकाळी ताथवडे येथे उघडकीस आली.

जयदीप प्रताप गायकवाड (वय 20, रा. ताथवडे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा उघडा असताना त्यावाटे चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातून 40 हजारांचा लॅपटॉप आणि 10 हजारांचा मोबाईल फोन असा 50 हजारांचा ऐवज चोरून नेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.