उघड्या दरवाजावाटे दोन लॅपटॉप पळवले

225

सांगवी, दि. १८ (पीसीबी) – उघड्या दरवाजावाटे खोलीत प्रवेश करून अज्ञातांनी दोन लॅपटॉप चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. १४) सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजताच्या कालावधीत नवी सांगवी येथे घडली.

दत्ता माधवराव जाधव (वय २५, रा. नवी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे नवी सांगवी येथे भाड्याच्या खोलीत राहतात. त्यांच्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा असताना त्यावाटे अज्ञात चोरट्याने खोलीत प्रवेश केला. खोलीतून ५५ हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप चोरट्याने चोरून नेले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.