इको गाडीचा सायलेन्सर चोरीला

75

चिखली, दि. २८ (पीसीबी) – राजेशिवाजीनगर चिखली येथून इको गाडीचा सायलेन्सर चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 21) सायंकाळी साडेपाच ते गुरुवारी (दि. 22) सकाळी अकरा वाजताच्या कालावधीत घडली.

संतोष शाम ठाकूर (वय 42, रा. राजेशिवाजीनगर, चिखली) यांनी याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची इको गाडी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केली होती. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी गाडीचा 10 हजार रुपये किमतीचा सायलेन्सर चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.