इंद्रा पार्क सोसायटी गणेशोत्सवात भव्य रंगभरण स्पर्धा

0
49

चिंचवड दि.८ (प्रतिनिधी)

शहरातील किवळे भागातील इंद्रा पार्क सहकारी गृहरचना संस्थेत गणेश चतुर्थीला श्रीगणेश मूर्तीची जल्लोष व मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. दरवर्षी इंद्रा पार्क सोसायटी सभासदांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असते याही वर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव या सोबतच शालेय मुलांसाठी रविवार दि.८ रोजी सकाळी ११ वाजता भव्य रंगभरण स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये मुलांनी अतिशय उत्साहात स्पर्धा गाजवली. लहान मुलांसोबत च सभासदांसाठी देखील अनेक विध उपक्रमाचे आयोजन या आयोजनात महिलांचा विशेष सहभाग असल्याचे कमिटीने सांगितले.इंद्रा पार्क बाप्पाची भव्य विसर्जन मिरवणूक देखील नियोजित असून या साठी सर्व नियुक्त कमिटी पदाधिकारी परिश्रम घेत असून सर्व कार्यक्रमात सर्वच सभासद मोठ्या उत्साहात सहभागी होऊन सण उत्सवाचा आनंद घेत आहेत.