इंडियन मेडिकल अससोसिएशनच्या वतीने गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन

72

पुणे,दि.१०(पीसीबी) – इंडियन मेडिकल अससोसिएशन पिंपरी चिंचवड भोसरी शाखेच्या वतीने ‘आओ गांव चले ‘ उपक्रमाअंतर्गत गोडुंबरे गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सुमारे 75 विध्यार्थ्यानी त्यात सहभाग घेतला व सुंदर गणेश मूर्ती बनवल्या.

अध्यक्ष डॉ सुशील मुथियान, सचिव डॉ अनिरुध्द टोणगावकर, खजिनदार डॉ विकास मांडलेचा, डॉ माया भालेराव, डॉ दीपाली टोणगावकर,डॉ सुधीर भालेराव, डॉ सुहास लुंकडं व इतर सदस्य या वेळी उपस्थित होते. त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन शालेय जीवनाची पुनःश्च अनुभूती घेतली.

डॉ दीपाली टोणगावकर, सौं मीनल टोणगावकर,जिल्हा परिषद शाळेचे मुख्यअध्यापक अल्हाट सर व सिटी प्राईड शाळेच्या शिक्षिका प्रणाली मॅडम, मयुरी मॅडम व भावेश सर यांचे विशेष सहकार्य लाभले.