आळंदी येथे दारू भट्टीवर छापा

0
72

कोयाळी, दि. २१ (पीसीबी) – खेड तालुक्यातील कोयाळी येथे दारू भट्टीवर आळंदी पोलिसांनी छापा मारला. यामध्ये दोन लाख 40 हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी (दि. 20) सायंकाळी करण्यात आली.

शबरी संजय गुडदावत (रा. कोयाळी, ता. खेड) या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार बाजीराव सानप यांनी आळंदी पोलीस ठाण्यात दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोयाळी येथे बेकायदेशीरपणे दारू भट्टी लावली असल्याची माहिती आळंदी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दारूभट्टीवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये दोन लाख 40 हजार रुपये किमतीचे कच्चे रसायन नष्ट करण्यात आले आहे. पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी महिला पळून गेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.