आळंदी येथे दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

0
89

पुणे, दि. १९ (पीसीबी): आळंदी येथे पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने एका दारूभट्टीवर छापा मारून कारवाई केली. त्यामध्ये दोन लाख 70 हजार 500 रुपयांचा ऐवज पोलिसांनी नष्ट केला. ही कारवाई रविवारी (दि. 18) सकाळी सव्वा अकरा वाजताच्या सुमारास पिंपळगाव वस्ती येथे करण्यात आली.

राजू छोटेलाल पटेल (वय 24, रा. मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी येथे पिंपळगाव वस्ती जवळ इंद्रायणी नदीच्या काठावर दारू भट्टी सुरु असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार रविवारी सकाळी पोलिसांनी दारूभट्टीवर छापा मारून कारवाई केली. त्यात 13 हजार लिटर गावठी दारू तयार करण्यासाठी भिजत घातलेले दोन लाख 70 हजार 500 रुपये किमतीचे रसायन नष्ट करण्यात आला असून 210 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.