आळंदीत महिलेचे गंठण हिसकावले

26

आळंदी, दि. २२ (पीसीबी) – रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलेचे दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी गंठण हिसकावून नेले. ही घटना सोमवारी (दि.19) रात्री नगर परिषद चौकाजवळ, आळंदी येथे घडली.

याप्रकरणी 44 वर्षीय महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्ह दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला सोमवारी रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास चालत घरी जात होत्या. नगर परिषद चौकात आल्यानंतर त्यांच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील ७० हजार रुपयांचे गंठण हिसकावले. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.