आर्थिक व्यवहारातून अपहरण करून मारहाण

91

तळेगाव दाभाडे, दि. ७ (पीसीबी) – आर्थिक व्यवहारातून चार जणांनी मिळून एका व्यक्तीचे अपहरण केले. त्याला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 6) सकाळी सोमाटणे टोल नाक्याजवळ घडली.

व्यंकट नामदेवराव मुडे (वय 44, रा. चौराईनगर, सोमाटणे फाटा, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजू आत्माराम सुगावे (वय 38, रा. चौराईनगर, सोमाटणे फाटा, ता. मावळ) आणि दोन ते तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू याने फिर्यादी यांना हातउसने पैसे दिले होते. त्या पैशांच्या कारणावरून त्याने त्याच्या दोन ते तीन साथीदारांसोबत मिळून शनिवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी यांना सोमाटणे फाटा येथे मारहाण केली. त्यांनतर जबरदस्तीने दुचाकीवर बसवून सोमाटणे टोल नाक्याजवळ असलेल्या जकात नाक्यासमोर नेऊन पुन्हा मारहाण केली. त्यांनतर शेलारवाडी रोडला घेऊन जाऊन तिथे लाकडी दांडक्याने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.