आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून टोळक्या कडून एकास मारहाण

0
527

मुंबई, दि. १६ (पीसीबी) – गाडीच्या व्यवहाराच्या कारणावरून पाच जणांनी मिळून एका व्यक्तीला सिमेंट ब्लॉक आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना बुधवारी (डी. 15) मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास जुनी सांगवी येथे घडली.

रोहन हरिप्रसाद जैसी (वय 44, रा. पिंपळे निलख) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वीरेंद्र विजय राणा, सुशील रामचंद्र पाटील, सुनील धोत्रे, सचिन उर्फ नाना पळसकर, रुपेश आतिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन यांचा मित्र कृष्णा आणि आरोपी यांचा गाडीच्या व्यवहाराच्या कारणावरून वाद झाला. त्यावरून आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून रोहन आणि त्यांचा मित्र कृष्णा याला सिमेंट ब्लॉक आणि लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.