आर्थिक कारणावरून महिलेला मारहाण

0
31

पिंपरी, दि. 29 (पीसीबी) : आर्थिक कारणातून महिलेला मारहाण करण्‍यात आली. याप्रकरणी तीन जणांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. ही घटना गुरूवारी (दि. २८) दुपारी साडेचार वाजताच्‍या सुमारास मिलिंदनगर, पिंपरी येथे घडली.

याबाबत ३० वर्षीय महिलेने गुरुवारी (दि. २८) पिंपरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मंगल संजय म्‍हस्‍के (वय ३७), रोहित संजय म्‍हस्‍के (वय २२) आणि प्रेम संजय म्हस्के (वय १८, सर्व रा. मिलिंदनगर, पिंपरी) यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, गुरूवारी (दि. २८) दुपारी साडेचार वाजताच्‍या सुमारास मिलिंदनगर, पिंपरी येथे आरोपींनी आपसांत संगनमत करून रिक्षाचे राहीलेले पैसे देण्याच्या कारणावरुन भांडण केले. यामध्‍ये फिर्यादी महिला व तिचे पती यांना शिवीगाळ केली. आरोपी प्रेम म्‍हस्‍के याने फिर्यादी महिलेला लोखंडी पाइपने डोक्यामध्ये मारुन जखमी केले. तसेच फिर्यादी यांच्या घरावर दगडे फेकून मारली. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.