आरटीओ , महापालिकेच्या वतीने मोशी परिसरात तिरंगा रॅली

45

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने इनोव्हेटिव्ह शाळा मोशी व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड यांच्या सहकार्याने घरो घर तिरंगा अभियान रॅली आज काढण्यात आली. आयुक्त राजेश पाटील यांच्या निर्दशा नुसार सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या रॅलीत चारशे शालेय विद्यार्थी,शिक्षक,ज्येष्ठ नागरिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकारी यांचा सहभाग होता.

भारत माता की जय,वंदे मातरम,अशा गर्जनांनी मोशितील रिव्हर रेसिडेन्सी,स्वराज रेसिडेन्सी व परिसर दुमदुमून गेला.प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हाता मध्ये तिरंगा ध्वज होता.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध घोषणा व स्वच्छतेच्या बाबतीत जनजागृती करणारे संदेश या रॅलीचे माध्यमातून देण्यात आले.

या रॅलीत संस्थेचे अध्यक्ष संजय सिंग,संचालक प्रशांत पाटील,तानाजी दाते,सहाय्यक आरोग्य अधिकारी,परिवहन कार्यालयाच्या निरीक्षक अनुराधा जुमडे,कोमल गाडेकर,अमृत गोडसे, रवींद्र गावडे,आरोग्य निरीक्षक राजेंद्र उज्जिनवाल,वैभव घोळवे,संजय मानमोडे,क्षितिज रोकडे आदी सहभागी झाले होते.