आम्ही 10 दिवस सुनावणी पुढे ढकलली, तुम्ही सरकार बनवले?

75

 नवी दिल्ली, दि. ३ (पीसीबी): महाराष्ट्रातील शिवसेनेवरील अधिकाराबाबत आज पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंनी जोरदार वादावादी झाली. मात्र, या युक्तिवादाच्या दरम्यानच सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला काही अवघड प्रश्नही उपस्थित केले. त्याचवेळी कोणताही निष्कर्ष न निघाल्याने आजची सुनावणीही पुढे ढकलून उद्याची नवीन तारीख देण्यात आली.

उद्धव कॅम्पचे वकील कपिल सिब्बल यांनी असा युक्तिवाद केला की जर दोन तृतीयांश आमदारांना वेगळे व्हायचे असेल तर त्यांना कोणात तरी विलीन व्हावे लागेल किंवा नवीन पक्ष काढावा लागेल. तो मूळ पक्ष आहे असे म्हणता येणार नाही. त्यावर सरन्यायाधीश म्हणाले की, तुम्ही म्हणत आहात की त्यांनी भाजपमध्ये विलीन व्हायला हवे होते किंवा वेगळा पक्ष काढायला हवा होता. तेव्हा सिब्बल म्हणाले की, हेच कायद्याने करायचे आहे.

सर्व पक्षकारांनी या प्रकरणाशी संबंधित कायदेशीर प्रश्नांचे संकलन सादर केले आहे का, अशी विचारणा सरन्यायाधीशांनी केली. गव्हर्नरचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, मी आता माहिती जमा करत आहे.

पक्ष म्हणजे केवळ आमदारांचा गट नाही

सिब्बल म्हणाले की, पक्ष म्हणजे केवळ आमदारांचा गट नाही. या लोकांना पक्षाच्या बैठकीत बोलावण्यात आले होते. ते आले नाहीत. उपसभापतींना पत्र लिहिले. त्यांचा प्रतोद नेमला. खरे तर त्यांनी पक्ष सोडला आहे. तो मूळ पक्ष असल्याचा दावा करू शकत नाही. आजही शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आहेत.

सिब्बल म्हणाले की जेव्हा 10वी अनुसूची (पक्षांतरविरोधी तरतूद) घटनेत जोडली गेली तेव्हा त्याचा काही उद्देश होता. असा गैरवापर होऊ दिला तर बहुसंख्य आमदार अन्यायकारकपणे सरकार पाडून सत्ता मिळवत राहतील आणि पक्षाचा दावाही करत राहतील. सिब्बल म्हणाले, पक्ष सोडलेल्या आमदारांना अपात्र ठरवले जाते. असे असेल तर कोणी निवडणूक आयोगाकडे जाऊन पक्षावर दावा कसा करू शकतो?

आम्ही सुनावणी 10 दिवस पुढे ढकलली. दरम्यान तुम्ही सरकार स्थापन केले आहे. स्पीकर्स बदलले. आता तुम्ही म्हणताय, सर्व काही निरर्थक आहे. साळवे – मी आता या गोष्टींवर असे म्हणत नाही.

साळवे – या गोष्टींचा आता विचार करू नका असे माझे म्हणणे नाही सरन्यायाधीश – ठीक आहे आम्ही सर्व मुद्दे ऐकून घेऊ

सिब्बल व शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांच्यात युक्तिवाद झाला की ज्या नेत्याला बहुमत नाही. तो कसा टिकेल? सिब्बल यांचे म्हणणे प्रासंगिक नाही, यावर साळवे म्हणाले की, या आमदारांना कोणी अपात्र केले? पक्षात अंतर्गत फूट पडली असताना अन्य गटाच्या बैठकीला उपस्थित न राहिल्याने अपात्रता कशी काय?

साळवे CJI यांच्यातील वाद –
अशा प्रकारे पक्षाला काही अर्थ राहणार नाही. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर कोणीही काहीही करू शकतो.

साळवे- नेता म्हणजे संपूर्ण पक्ष मानला जातो असा आपला भ्रम आहे. आम्ही अजूनही पक्षातच आहोत. आम्ही पक्ष सोडलेला नाही. आम्ही फक्त नेत्याविरोधात आवाज उठवला आहे.