आपण फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही – अजित पवार

0
71
  • विधानसभेला पुन्हा नव्या जोमाने भरारी घेऊ

शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा कायम राहणार आहे, त्यात कुठेही तडजोड नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठामपणे सांगितले. येत्या १५ ऑगस्ट पर्यंत राष्ट्रवादीचे तीन सदस्य राज्यसभेत असतील. अपयशाने खचून जाऊ नका, आपण विधानसभेला पुन्हा नव्या जोमाने उभारी घेऊ, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली.
राष्ट्रवादीच्या रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही तरी एक गोष्ट मान्य करावी लागेल की छत्रपती शिवाजी महारांजी राजधानी असलेल्या रायगडची जागा आपणाला मिळाली आहे. सुनिल तटकरे यांनी काही का होईन पक्षाची लाज राखली. अपयशाने कोणीही खचून जाऊ नका, नव्या दमाने पुन्हा कामाला लागा. येत्या विधानसभेला आपण पुन्हा उभारी घेऊ.

अजित पवार यांनी आपल्या विस्तृत भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस स्थापने पासूनच्या घटना घडामोडींचा आढावा घेतला. शरद पवार यांचे ऋण व्यक्त करताना त्यांचे नाव घेतले तेव्हा त्यांना गदगदून आले होते. मोदी यांच्या मंत्रीमंडळात संधी मिळाली नाही, मात्र त्यावर आलेल्या सर्व बातम्या या कपोलकल्पित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माध्यमांशी बोलतनाना पक्षाच्या नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी काय पथ्य पाळली पाहिजेत यावर अजित पवार यांनी काही मोलाच्या सुचना केल्या.

शरद पवार यांचंही पक्ष स्थापनेत मोठ काम आहे. मी त्यांना ही कृतज्ञता व्यक्त करतो. पक्ष स्थापनेवेळी सोनिया गांधी यांचा परदेशी मुद्दा काढला, मात्र त्यावेळी आपल्याला कमी वेळ निवडणुकीत मिळाला. ⁠सर्वांनी प्रयत्न केला त्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो. 33 टक्के जागा महिलांना होत्या, त्या आपण 50 टक्के करण्याचा निर्णय घेतला. ⁠डांन्सबार बंदी आणि गुटखा बंदीचा निर्णय आपण घेतला होता”, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

संबंध नसताना गैरसमज पसरवण्याच काम काहीजण करत होते
अजित पवार म्हणाले, संबंध नसताना गैरसमज पसरवण्याच काम काहीजण करत होते. दोन दिवस दिल्लीत होतो. आम्ही एकत्र जेवण केलं. ⁠काहीही वाद नव्हता. तरीही चुकीच्या बातम्या लावल्या. देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्टीकरण दिलं. तुमची लोकसभेची एकच जागा आली आहे. तुम्हाला एक मंत्रीपद द्यायचं आहे, असं म्हणाले होते. ⁠राज्यसभा देऊन स्वतंत्र कार्यभार दिला जाणार होता. आता दोन खासदार आहेत. जुलैपर्यंत आणखी एक खासदार वाढणार हे तुम्हाला मी आताच सांगतो, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, पक्षाच्या कार्यालयात ठराविक लोक बसली पाहिजेत. ⁠बाकी इतर लोकांनी सात दिवसात काय दौरा केला याची माहिती घ्या. ⁠मंत्र्यांनाही याच सूचना आहेत. आपण जरी महायुतीत असलो तरी आपण फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही. महायुतीच्या नेत्यांनाही हे आपण सांगितलं आहे. ⁠जोपर्यंत चंद्र सुर्य आहे, तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान कोणीच मायचा लाल बदलू शकत नाही. ⁠नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न आपले विरोधक करतील. हे अधिवेशन झाल की जातील असं ही सांगितलं की, हे 75 वे संविधान वर्ष साजरे करण्याचे एनडीएने सांगितलं आहे. यावेळी जे अपयश मिळालं याची जबाबदारी मी घेतो, असंही अजित पवार म्हणाले.