आत्ताच हाफ मर्डर मधून बाहेर आलोय म्हणत तरुणाचा कोयता घेऊन पिंपरीत राडा

1286

पिंपरी, दि.२४ (पीसीबी) – आत्ताच हाफ मर्डर मधून बाहेर आलोय. सर्वांनी मला हप्ता द्यायचा. नाहीतर एकेकाला तोडून टाकीन असे म्हणत एका तरुणाने कोयता घेऊन पिंपरी गाव परिसरात राडा घालून दहशत निर्माण केली. ही घटना गुरुवारी (दि. 23) दुपारी घडली.

सलमान शेख (वय 30, रा. काळेवाडी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रकाश बहादूर शहा (वय 24, रा. पिंपरीगाव) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा हातात धारदार कोयता घेऊन आला. पिंपरी गावात नवमहाराष्ट्र शाळेकडून म्हाडा कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्याने कोयत्याचा धाक दाखवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. ‘सगळ्यांनी मला घाबरायचे. मला सलमान भाई म्हणतात. आत्ताच हाफ मर्डर मधून बाहेर आलो आहे. सर्वांनी मला हप्ता द्यायचा. नाहीतर एकेकाला तोडून टाकीन’ अशी धमकी देत रस्त्याने जाणाऱ्या लोकांना कोयता दाखवून त्यांच्या अंगावर धावून गेला. त्याच वेळी फिर्यादी शहा हे तिथून जात होते. सलमान शेख हा कोयता घेऊन शहा यांच्या अंगावर आला. शहा हे घाबरून आडबाजूला पळून लपून बसले. त्यावेळी अनेक नागरिक आरोपीच्या धाकाने धावपळ करीत होते. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.