आईसोबत बोलल्याच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण

0
710

चिंचवड,दि. १६ (पीसीबी) – आईसोबत बोलल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता भोईरनगर, चिंचवड येथे घडली.

गौरव ज्योतीराम जोगदंड (वय 20), कुणाल बाळू कांबळे (वय 19, दोघे रा. दळवीनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुदर्शन दत्ता सूर्यवंशी (वय 24, रा. दळवीनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदर्शन हे 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास भोईरनगर येथील जयवंत माध्यमिक विद्यालय येथे थांबले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी कुणाल कांबळे याने ‘माझ्या आईशी कां बोलतो’ असे म्हणत सुदर्शन यांच्या हातावर सिमेंटच्या गट्टूने मारले. तर गौरव याने ‘माझ्या मामीशी बोलायचे नाही’ असे म्हणत सिमेंटच्या ब्लॉकने सुदर्शन यांच्या डोक्यात मारून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.