आंतर शालेय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेमध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे रमा सदन ने पटकावले सांघिक विजेतेपद

0
110

निगडी, दि. १४ (पीसीबी) – समर्थ भारत अभियान आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे यांनी आयोजित केलेल्या आंतरशालेय मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी रमापुरुषोत्तम संकुल महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आवार येथे संपन्न झाल्या. गेले तीन महिने चाललेल्या या स्पर्धेमध्ये पुण्यामधील 50 शाळांनी सहभाग नोंदवत साधारण साडेचार हजार विद्यार्थ्यांचा सहभाग होता. अंतिम फेरीसाठी नर्सरी ते नववी दहावी आणि पालक शिक्षक गट यामधून एकूण 677 विद्यार्थी अंतिम फेरीत दाखल झाले होते. या स्पर्धेचा लगेचच बक्षीस समारंभ संपन्न झाला या बक्षीस समारंभासाठी अजेय बुवा रामदासी हे अध्यक्ष म्हणून लाभले होते त्यांनी मुलांची संवाद साधताना त्यांचा हिरो कोण असावा याबद्दल मार्गदर्शन करताना प्रभू रामचंद्र हे आपल्या आयुष्याचे हिरो असायला पाहिजे असे सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉक्टर श्री प्रवीण दबडगाव यांनीही मुलांना संबोधन करताना संघटन आणि पाठांतर याविषयी मार्गदर्शन केले.

सन्माननीय उपस्थिती महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उपकार्याध्यक्ष सौ विद्याताई कुलकर्णी यांनीही मुलांना पाठांतराचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमांमध्ये रमा सदन च्या१०० मुलींनी शिवतांडव स्तोत्र आणि काळभैरवाष्टकम सादर करून सर्व उपस्थितांची मने जिंकली. विजन इंग्लिश स्कूल नरे या शाळेने सर्वाधिक सहभागाचे पारितोषिक पटकावले विविध गटांमधून या शाळेकडून 480 विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समर्थ भारत अभियान चे डॉक्टर राजीव नगरकर यांनी सादर केले.सध्याच्या काळामध्ये हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि अँटिव्हायरस या तिघांचा विचार समर्थ रामदास स्वामींनी किती समर्पक पद्धतीने त्या काळी केला होता. हार्डवेअर साठी सूर्यनमस्कार सॉफ्टवेअर साठी मनाचे श्लोक आणि राम नामाचे अँटीव्हायरस याची जाणीव मनाच्या श्लोकातून प्राप्त होते. श्रीमंत ग्रंथराज दासबोध अध्ययन उपक्रमाचे अध्यक्ष श्री सुहास क्षीरसागर यांनी उपस्थित राहून सर्व विद्यार्थी आणि कार्यकर्ते यांना आशीर्वाद दिले. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष श्री संजीव जावळे हे ही या कार्यक्रमात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ योगिता तोडकर यांनी केले. श्री उदय काळे आणि श्री राजेश शिराळकर यांनी कल्याणकरी रामराया हे पद गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.आभार प्रदर्शन श्रीराम पोतदार यांनी केले. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे यांच्या कार्यकर्त्यांनी सर्व नियोजनाची जबाबदारी पार पाडली.