अवैध हुक्का विक्री प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

147

बावधन, दि. ८ (पीसीबी) – वैधानिक इशारा, तयार केल्याची तारीख, मुदत संपण्याची तारीख अशी माहिती नसलेला हुक्का नागरिकांना विकला. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. ६) दुपारी द स्मोक शॉप, शिंदेनगर बावधन येथे करण्यात आली.

दुकान चालक आशिर इब्राहिम मोहम्मद (वय २३, रा. कोथरूड), दुकान मालक रमीज अजीज कलनांडी (वय २४, रा. खेड शिवापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक सचिन बेंबळे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या दुकानात देशी, विदेशी कंपनीचे हुक्का फ्लेवर विक्रीसाठी ठेवले. त्या हुक्का फ्लेवरच्या पाकिटांवर वैधानिक इशारा, हुक्का फ्लेवर तयार केल्याची तारीख, मुदत संपण्याची तारीख अशी कोणतीही माहिती दिली नव्हती. असा अवैध हुक्का फ्लेवर आरोपींनी त्यांच्या दुकानातून विकला. याबाबत माहिती मिळाल्याने हिंजवडी पोलिसांनी कारवाई करून ४१ हजार ८४ रुपयांचा हुक्का फ्लेवर जप्त केला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.