अल्पवयीन मुलीवर लैगींक अत्याचार ; एकास अटक

0
242

आळंदी, दि.२७ (पीसीबी)- अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार करत तिला गर्भवती केल्या प्रकरणी तरुणाला दिघी पोलिसांनी अटक केली आहे.हा प्रकार जानेवारी ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत आळंदी येथे घडला होता.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिघी पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल केला असून अमित अंकुश इंगोले (वय 21 रा. दिघी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी 17 वर्षाची आहे हे माहिती असून देखील आरोपीने तिच्यावर दोनवेळा लैगिंक अत्याचार केले. यामुळे फिर्यादी यांची मुलगी 4 महिन्यांची गर्भवती राहिली आहे. यावरून दिघी पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.