अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाला अटक

56

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – अल्पवयीन मुलीला इमारतीच्या टेरेसवर बोलावून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना 8 जून टे 28 जून या कालावधीत इंदिरानगर, चिंचवड येथे घडली. वृषभ नंदू जाधव (वय 19, रा. चिंचवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अल्पवयीन पिडीत मुलीच्या पालकांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन आहे. आरोपीने त्याचा वाढदिवस असल्याचे कारण सांगून मुलीला तो राहत असेलल्या बिल्डींगच्या टेरेसवर बोलावून घेतले. तिथे तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर आरोपीने पिडीत मुलीला मोबईल फोन वापरायला दिला. फोन करून मुलीला टेरेसवर बोलावून वारंवार आरोपीने मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत

WhatsAppShare