अमृता फडणवीस यांनी केले अजितदादांचे कौतुक

0
127

पुणे, दि. २५ (पीसीबी) : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक केलं आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. यापूर्वी राष्ट्रवादीवर सडकून टीका करणाऱ्या अमृता फडणवीसांच्या या विधानामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित पवार चोवीस तास काम करतात, कामाप्रती ते समर्पित आहेत. कामाच्याबाबतीत अजित पवार हे देवेंद्र फडणवीसांचे भाऊ आहेत. ते राष्ट्रवादीतील एकमेव चांगलं काम करणारे नेते आहेत. सध्या ते या बाजूनं आहेत याचा आनंद आहे, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, “पुण्यातील गणेशोत्सवाबाबत बोलताना फडणवीस म्हणाल्या, खुप आनंद होतोय, महाराष्ट्रात आनंदाच वातावरण आहे. पुण्यात आले आज लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव पुण्यातूनच सुरू केला तिथेच मी एक गाणं म्हणतेय. मी प्रत्येकासाठी साकडं घातलं आहे”