अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

413

चिंचवड, दि. २१ (पीसीबी) –  चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार  राहुल कलाटे यांनी आज (सोमवारी ) मतदानाचा हक्का बजावला.  वाकड  येथील महापालिकेच्या शाळेत त्यांनी पत्नी वृषाली कलाटे, आई कमल कलाटे  यांच्यासह मतदान केले.

वाकड येथील कमल प्रतिष्ठानच्या माऊली लिटराजन स्कूलमधील मतदान केंद्रावर कलाटी यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.

चिंचवड मतदारसंघात ४९१ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. ११ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये आज बंद होणार आहे.

मी मतदान केले आहे. सर्वांनी मतदान करून आपला हक्क बजवावा, लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहाभागी व्हावे, असे आवाहन कलाटे यांनी चिंचवड मतदारसंघातील मतदारांना केले आहे.

दरम्यान, राहुल कलाटे चिंचवड मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.  त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी, मनसे, वंचित आघाडीने पाठिंबा दिला आहे.

 

WhatsAppShare