“अन्नकोट – दीपावली स्नेहमिलन” कार्यक्रमात १५०० कुटुंबांचा सहभाग

0
162

आकुर्डी,दि.२६(पीसीबी) – महेश सांस्कृतिक मंडळ पिंपरी-चिंचवडच्या वतीने शनिवार (२५ नोव्हेंबर) रोजी आकुर्डीतील खंडेराय मंगल या ठिकाणी भव्य अन्नकोट – दीपावली स्नेहमिलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मागील ४० वर्षा पासुन माहेश्वरी समाज आयोजित करत आहे. ह्या वर्षी समाजातील तब्बल १५०० कुटुंबांनी हजेरी लावली.

यावेळी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या हस्ते महेश पुजन करण्यात आले. तसेच मंडळाचे अध्यक्ष अजय लढ्ढा, सक्रेटरी सागर सारडा, महिला टीम, युवा टीम, एम पी एफ टीम यांनी कार्यकमाचे यशस्वी आयोजन केले.