अत्याचारास विरोध करणाऱ्या मुलीचे डोके भिंतीवर आपटले

0
121

अत्याचारास विरोध करणाऱ्या मुलीचे डोके भिंतीवर आपटून तिला गंभीर जखमी केले. ही घटना रुपीनगर येथे रविवारी (दि. ७) दुपारी घडली.

वीराप्पा खुशाबा बंदीछोरे (वय 19, रा, रुपीनगर, तळवडे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अल्पवयीन मुलगी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत फिर्यादी अल्पविन मुलगी आरोपी वीरप्पा याच्या घराजवळ पायी चालली होती. त्यावेळी आरोपीने तिला जबरदस्तीने घरात ओढून घेत तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. त्यास अल्पवयीन मुलीने विरोध केला असता तिचे डोके भिंतीवर आपटून तिला जखमी केले. या घटनेत अल्पवयीन मुलीला चक्कर आल्याने ती बेशुद्ध पडली. पोलिसांनी पोक्सोसह लैंगिक अत्याचार आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.