अत्यंत खळबळजनक… – आता एकनाथ शिंदे यांचा शिवेसेनेवर दावा

102

– शिवसेनेचे ३४ नव्हे ४० आमदार आपल्या बरोबर

गुवाहाटी, दि. २२ (पीसीबी) – शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचं बंड आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. शिवसेनेचे ३५ नव्हे तर ४० आमदार आपल्यासोबत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. या आमदारांना काल रात्री उशिरा आसाममधल्या गुवाहाटी इथं नेण्यात आलं आहे. शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र शिंदे भूमिकेवर ठाम आहेत. शिवसेनेने भाजपासोबत सरकार बनवावं, मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल अशी भूमिका शिंदेंनी घेतली आहे. आज सायंकाळी शिंदे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार असल्याचे समजले. दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी कोरोनाची बाधा झाली असल्याने पेच निर्माण झाला आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सुरेश प्रभू यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध असल्याचं सांगितलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते अजय चौधरी यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे.