अतुल परदेशी यांचा “मराठवाडा पत्रकारीता रत्न” पुरस्कार देऊन सन्मान

30

पिंपरी, दि. २१ (पीसीबी) – मराठवाडा सेवक प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने ७४ व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त “मराठवाडा रत्न पुरस्कार” वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सोमवारी झालेल्या कार्यक्रमात आवाज न्यूज नेटवर्कचे संपादक अतुल परदेशी यांना पत्रकारितेतील मराठवाडा रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, संगीतकार रविंद्र घांगुर्डे, पंडित सुहासजी व्यास किशोर सरपोतदार यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष दिनकर चौधरी यांनी प्रास्ताविक केले तर कार्याध्यक्ष शोभा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.